किल्ले धारूर (वार्ताहर) येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदर्श शिक्षक कै भास्कर शिनगारे यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन दि १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत केले आहे
दर वर्षी पुण्यतिथी निमित्त जनता विद्यालय भव्य वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेतली जाते परंतु या वर्षी कोरोना मुळे ही स्पर्धा घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ५ वी ते ७ वी प्रथमिक वर्गासाठी ' कोरोना काळात मोबाईल शाप की वरदान ' हा विषय देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागासाठी प्रथम पारितोषिक ५०१ रू, द्वितीय पारितोषिक ३०१ रू, तृतीय पारितोषिक २०१ रू तर उतेजनर्थ पारितोषिक १०१ रू माध्यमिक विभाग निबंध स्पर्धेसाठी ८ वी ते १० वी साठी विषय 'कोरोना एक जागतिक संकट' हा देण्यात आला आहे माध्यमिक विभागासाठी प्रथम पारितोषिक १००१ रू, द्वितीय पारितोषिक ७०१ रू, तृतीय ५०१ रू उतेजनार्थ २०१ रू पारितोषिक देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी आपला निबंध हस्तलिखित लिहून तो ९७६६७५७६५३ या क्रमांकावर पी डी एफ करून पाठवायचा आहे शेवटचा दिनांक १० ऑगस्ट असून स्पर्धेचा निकाल १३ ऑगस्टला दिला जाणार आहे स्पर्धेत एका विद्यालयाचे जास्तीतजास्त ३ विद्यार्थी सहभागी होवू शकतात सर्व विद्यालयाची सहभागी होण्याचे आवाहन जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा शिनगारे, विश्वास शिनगारे यांनी केले आहे
COMMENTS