*..अन् पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ते चित्र रेखाटत केले प्रभू रामचंद्रांना कलात्मक नमन !*

*..अन् पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ते चित्र रेखाटत केले प्रभू रामचंद्रांना कलात्मक नमन !*   मंदिर भूमिपूजन सोहळ्याला व्यक्त केल्या शुभेच्छा  ...

*..अन् पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ते चित्र रेखाटत केले प्रभू रामचंद्रांना कलात्मक नमन !*


 


मंदिर भूमिपूजन सोहळ्याला व्यक्त केल्या शुभेच्छा 


 


परळी दि. ०४ ----मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे उद्या (दि.५) प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. उपजतच चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी प्रभु श्रीरामाचे स्वहस्ते सश्रद्ध चित्र साकारत त्यांना कलात्मक नमन केले आहे.


 


        अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिर असावे ही आस्था उद्या प्रत्यक्षात साकारली जाणार आहे.अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतांना पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे.नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या पंकजाताई यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत आपला चित्रकलेचा व्यासंग विकसित केला आहे. यापुर्वीही त्यांनी रेखाटन केलेल्या चित्रावरुन मोठी चर्चा घडली होती.श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजाताईंच्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे.या माध्यमातून भुमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली त्यांनी "*Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam "shree ram".. big day tomorrow ..*" असे लिहीत मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम चरणी नमन केले आहे.


••••




COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel