विष्णू घुले यांच्या वतीने साड्यांचे वाटप (सामाजिक उपक्रमाने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा)


 



  • रमेश इतापे


केज राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी चे सरपंच विष्णू घुले तसेच पंचायत समिती सभापती परिमळा विष्णू घुले यांच्या वतीने सुमारे चाळीस महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.


 


      माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथे कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशाताई व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला. या महिलांनी पूर्ण तालुक्यात घरोघर जाऊन रुग्णांचा सर्वे केला. ग्रामीण भागात कोरोनापासून बचावासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी माहिती दिली.तसेच बाहेर गावातून आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाला देऊन प्रशासनाला मदत केली. अशा  कोरोना योद्धयांच्या सेवेचा गौरव करून साड्या वाटप केल्या. तर डॉ.वसुदेव नेहरकर यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधक Arsenic album 30 या औषधांच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन टाकळीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णू घुले व पंचायत समितीच्या सभापती परिमळा विष्णू घुले यांनी केले होते. यावेळी केज तालुका भाजपा अध्यक्ष भगवान केदार, डॉ.वसुदेव नेहरकर, दत्ता धस, जिवन हंगे, जोगदंड, हनुमंत साने, विक्रम डोईफोडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या