कु .पुजा गोविंद आकुलवाड ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम


 


 


 



  •  मुखेड (विठ्ठल कल्याणपाड


मुखेड तालुक्यातील शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाची विद्यार्थिनी कु .पुजा गोविंद आकुलवाड रा .आंबुलगा (बु) ता .मुखेड ही ग्रामीण भागातील मुलगी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून इयत्ता दहावी बोर्ड च्या परीक्षेत ८९.८० टक्के गुण घेऊन शांती निकेतन विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .कु .पुजा ही मोठ्या जिद्दीने अभ्यास करून दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवली तिच्या या यशाबद्द्ल नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर , आंबुलगा ग्रा.प. सरपंच सौ.सुशिलाताई संजयराव आकुलवाड, मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पा.अंबुलगेकर, शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरराव मामीलवाड , उपसरपंच विनोद गोविंदवार , प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उल्लिगडे, पोलिस पाटिल विठ्ठलराव कौरवाड ,आदीसह सर्व शिक्षकवृंद परिसरातील नागरिक यांच्या कडून कु.पुजा हिचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


टिप्पण्या