नांदेड प्रतिनिधी
उर्वरित निमशिक्षकांची सेवा एक मार्चपासून धरण्यात यावी व निमशिक्षकांचे मूळ कागदपत्रे तात्काळ देण्यात यावी यासाठी आज शिक्षक भारतीच्या वतीने जि प च्या अध्यक्षा मा.मंगाराणी आंबूलगेकर मॅडम यांचे पती मा.सुरेशभाऊ आंबूलगेकर साहेब यांना भेटून निवेदन दिले व खूप वेळ चर्चा केली तेंव्हा त्यांनी उद्याच मा.शिक्षणाधिकारी साहेबांना फाईल पुटप करण्यास सांगू व काही त्रुटी असेल तर सर्व ग. शि.अ.साहेबांना पत्र पाठवून त्रुटीची पूर्तता करण्यास सांगू असे आश्वासन दिले व उद्या सकाळी तुम्ही या म्हणाले त्यामुळे परत उद्या भेटून निमशिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच आज कार्यालयात मा.शिक्षणाधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही उपशिक्षणाधिकारी श्री आमदूरकर बंडू साहेबांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली तेंव्हा त्यांनी त्रुटी काय आहेत ते पाहून त्रुटीची पूर्तता करण्याबाबत पत्र काढू व लवकरच फाईल पुटप करू असे आश्वासन दिले .
यावेळी चंद्रकांत कुणके,जगजीतसिंह ठाकूर उपाध्यक्ष ,गुणवंत टेकाळे आदी उपस्थित होते.
COMMENTS