*आत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा*

    *विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन* *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक...

 


 



  • *विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन*



*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.


 


*भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या बैठकीचा समारोप करताना मा.फडणवीस बोलत होते.


 


मा.फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळाले आहे. चीनने लडाख सीमेवर केलेल्या घुसखोरीला आक्रमक उत्तर देऊन नरेंद्र मोदी यांनी सध्याचा भारत 1962 चा भारत नाही, हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प जाहीर केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.


 


राज्यातील कोरोना फैलावामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवा अशी सूचना वारंवार करूनही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या नाकर्त्या कारभाराचा फटका जनतेला बसत आहे, असेही मा.फडणवीस यांनी सांगितले.


 


मा. फडणवीस पुढे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आघाडी सरकार कुचराई करत आहे. बारा बलुतेदार वर्गाला आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून केंद्र सरकारने मोठी मदत करूनही आघाडी सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर दोषारोप करत आहे.


 


दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करेपर्यंत भाजपाचे आंदोलन चालूच राहील. 1 ऑगस्ट रोजी होणारे दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठीचे आंदोलन पूर्णपणे अहिंसक स्वरूपात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 


*(मुकुंद कुलकर्णी)*


 


*कार्यालय सचिव*


...


[27/07, 18:26] Somen Mukherjee: ...


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel