धर्माबाद (अहमद लड्डा) उमरी येथे झालेल्या बैठकीमध्ये नायगाव विधानसभेतील तिन्ही तालुक्याच्या सर्व बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडचणी बद्दल, आमदार राजेश पवार यांनी प्रत्येक बँकेच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल कर्ज घेण्यासंदर्भात चा विषय असेल किंवा लघुउद्योग व बचत गटांच्या प्रत्येक घटकांना, कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर खपून घेणार नसल्याचे सांगत, प्रत्येक बँकांमधे ताबडतोब कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश यावेळी आमदार श्री पवार यांनी दिले, विशेषता बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त कागदपत्रे मागण्याचा तगादा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी करू नये ,जर असं लक्षात आलं तर संबंधित कर्मचारी व बँकेतील अधिकाऱ्यांवर रीतसर कारवाई करण्यात येईल चे सांगत ,संबंधित बँक कर्मचाऱ्यांचे जिल्हा लीड प्रमुख म्हणून पठाडे साहेब हे सुद्धा ह्या बैठकीस उपस्थित होते,पठाडे साहेबांनी सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्यांना आमदारांनी सांगितलेल्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले, व नवीन कर्ज संदर्भात कसल्याही प्रकारचे बँक कर्मचारी सतवणूक करत असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधावा. जेणेकरून सदरील कर्मचाऱ्याच्या विषयी रीतसर तक्रार करता येईल.
आमदार साहेबांचे विशेष आभार, कारण अशा प्रकारचे सर्व बँकांच्या अधिकार्यांना एकत्र आणून बैठक घेण्याचा योग हा विधानसभेत प्रथमताच आला असावा. साहेब आपण असेल तर आमच्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही पुन्हच: आपले आभार - श्री विजय डांगे (माजी भाजपा तालुका अध्यक्ष) धर्माबाद.
COMMENTS