ॲड, सुभाष राऊत यांना विधान ,परिषदेवर घ्या- बळीराम ढगे
माजलगाव (प्रतिनिधी )
राज्यपाल नियुक्त विधान पंधरा जागा रिकाम्या होत आहेत या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते तथा महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड, सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेवून बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी महात्मा फुले समता परिषद माजलगाव तालुका अध्यक्ष बळीराम ढगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे अॅड सुभाष राऊत हे ओबीसी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवरात्र लढणारे आहेत त्यांनी अनेकदा बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन रस्ता रोको जेलभरो आंदोलन केले आहेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या सरकारने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे औरंगाबाद विभाग अध्यक्ष अॅड सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेऊन बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी बळीराम ढगे तालुकाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे बळीराम ढगे तालुका अध्यक्ष शिवप्रसाद खेत्रे, दिनेश गायकवाड ,राजेभाऊ कटारे, श्याम कटारे ,लक्ष्मण जंगले, संजय गंगे ,सुधाकर रासवे, सावता रासवे ,संजय गंगे ,अशोक बेबरे ,अशोक ढगे यांनी केली आहे.
COMMENTS