🔴कलाकारांनी पडदा उघडण्यासाठी नटराजाकडे घातले साकडे*

पुणे - बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडा...

पुणे -


बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नटराजकडे साकडे घातले.


 


सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सर्वांना दिले.


 


आनंददायी वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी सर्व कलाकारांनी साजरा केला.सालाबादप्रमाणे २६ जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा ५३ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला.


 


कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लक्ष्मीकांत खाबिया व परिवारातील मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.


 


मेघराज राजेभोसले म्हणाले, बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन बालगंधर्व परिवारातर्फे १४ वर्षे साजरा केला जातो. हा सोहळा ३ दिवस साजरा होतो. पुण्यातील सर्व कला प्रेमींसाठी एक पर्वणी असते यात भावगीत, भक्तीगीतापासून लावणीपर्यंत सर्व कला आविष्कार साजरे केले जातात.


 


पुणेकरासाठी मोफत असलेला कार्यक्रम गेली 14 वर्षे साजरा केला जातो. अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असतात.


 


सकाळी जादूचे प्रयोग ,भावगीत,भक्तीगीत, लोकधारा, एकपात्री प्रयोग, महिलांसाठी लावणी, संगीत रजनी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती, सिनेसृष्टीतील अनेक गाजलेले कलावंत या मोहोत्सवात आतापार्यंत सहभागी झालेले आहेत.


 


या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांचा मेळावा पाहायला मिळायचा. तसेच सर्व कलाकारांच्या अडचणी असतील किंवा एकमेकांची विचारपूस करण्यासाठी तीन दिवस एकत्र असायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्रितपणे एखाद्या रंगमंदिराचा अशा प्रकारे वर्धापनदिन साजरा करणारे एकमेव पुणे शहर व बालगंधर्व रंगमंदिर असेल.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group