अपघातात माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा मृत्यू... हदगाव : परभणी येथून हदगावकडे कारने येताना अपघात होऊन माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा मृत्...
अपघातात माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा मृत्यू...
हदगाव : परभणी येथून हदगावकडे कारने येताना अपघात होऊन माजी उपनगराध्यक्षाच्या
मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दिनाक १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हदगाव शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मानवाडी फाटा येथे घडली आहे.
हदगाव येथील माजी उपनगराध्यक्ष खदिर खान पठाण यांचा मुलगा बक्सु खान पठाण वय २३ वर्ष रा.हदगाव हा परभणी येथून आपल्या मित्रासोबत कारने येत असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मानवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला कट मारल्याने कार पलटी होऊन अपघात झाला.यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास प्राथमिक उपचारासाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
COMMENTS