माजलगाव/ भास्कर गिरी
माजलगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी लोकेशन बघून बेकायदेशीरपणे बेसुमार वाळू उपसा केला जातो वाळू उपसा करण गुन्हा असताना ही त्याचा कोणत्याही प्रकारचा लिलाव झालेला नाही तरी असे असताना माजलगाव तालुक्यातील शुक्ल तीर्थ लिमगाव,मोगरा,सादोळा,हिवरा,रिधोरी,कवडगाव या गोदावरी पट्यात बेसुमार वाळू उपसा केला जातोय. मात्र प्रशासनचे याकडे दुर्लक्ष आहे. वाळू उपसा करून शहरात व पुनर्वसन परिसरात किंवा इतर ठिकाणी अवाच्या सव्वा किम्मत लावून म्हणजे हायवात भरलेली 6 ब्रास म्हणून ती साडेपाच ब्रास वाळू 44 हजार रुपयाला विकली जाते, ही वाहतून रात्री 3 ते 4 च्या सुमारास गाडी माजलगाव परिसरात पोलिसांच्या डोळ्या समोरून येते तरी याकडे माजलगाव प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डोळ्यामोरून-महसून विभागाच्या दारातू वाळू जात असतांना कारवाई का होत नाही? हा महत्वचा प्रश्न आहे.
सध्या लॉकडाऊनच्या काळात या वाळू तस्करांचा रात्रंदिवस धुमाकूळ चालू आहे, लॉकडाऊन असताना हे अवैध धंदे चालत असतील तर एरवी काय परिस्थिती असेल हे सध्याच वास्तव सांगेल. तरी देखील माजलगाव महसूल विभाग,शहर व ग्रामीण पोलीस, यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे काय? आता सवाल आता उपस्थित होत आहे.
हा अवैध वाळू उपसा होत असलेला प्रकार थांबवावा या करिता जिल्हाधिकारी बीड यांनी अवैध वाळू उपशा वर बंदी आणावी नसता आयुक्तांनी तरी या अवैद्य धंद्यावर बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
COMMENTS