मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला संबोधन...

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा, ईद घरात बसून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन* सर्व सण...

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा, ईद घरात बसून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन*


सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा .


गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील.


मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही.


मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण, ४७ हजार हा एकूण आकडा, जवळपास १३ हजार कोरोनामुक्त.


महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार, मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी.


कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील.


जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे.


पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या.


सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा.


बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास ७ हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध राहतील.


मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला.


पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्व वर्गासाठी मदत.


महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के लोकांना मदत, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली.


राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या, त्याने सहा ते सात लाख मजूर गावी, ८५ कोटी रुपये खर्च.


तीन लाख ८० हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, ७५ कोटी रुपये खर्च


पुढच्या १५ दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो, ५०हजार उद्योग सुरु, सहा लाख कामगार रुजू.


शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी, राजकारण करू नका, तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही, महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास, आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही.


राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष.


राज्यात अनेक मैदानं, सभागृह आम्ही सज्ज ठेवली आहेत.


राज्याला पुन्हा एकदा रक्त पुरवठ्याची गरज, ज्यांना रक्तदान करायचं, त्यांनी पुढे यावं, रक्तदान करावं.


राज्यात आत्तापर्यंत साडे तीन लाख कोरोना चाचण्या झाल्या असून आता प्रत्यक्षात राज्यात ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा, ईद घरात बसून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group