माजलगाव/ प्रतिनिधी
कोरोना रुग्नाचा आकडा रोज वाढत असतानाच काल पाठवण्यात आलेल्या ५७ नमुन्यांपैकी ५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ०७ जणांचे अहवाल वेटिंगवर ठेवण्यात आले आहेत या मध्ये माजलगाव येथील २ तर बीड येथील ०५ जणांच्या नमुन्याचा समावेश आहे .या सात जणांचे अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ अशोक थोरात यांनी दिली
कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले आणि या आजाराची लक्षणे दिसणारे 55 रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते . यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 34, गेवराई 3, माजलगाव 15, आष्टी 3 अशा एकूण 55 रूग्णांच्या नमुन्यांचा समावेश आहे. अन्य ठिकाणावरून २ जणांचे असे ५७ नमुने तपासणी साठी पाठवले असता आज ५० जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह आले असून ०७ जणांचे अहवाल वेटिंगवर ठेवण्यात आले आहेत या मध्ये माजलगाव येथील २ तर बीड येथील ०५ जणांच्या नमुन्याचा समावेश आहे .
COMMENTS