अशोक चव्हाण नांदेडहून मुंबईकडे रवाना*
नांदेड ( २५. ग्लाेबल मराठवाड़ा प्रतिनिधी ) सावजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अशोक चव्हाण हे मागील काही दिवस मुंबईत होते. त्यानंतर चव्हाण हे चार ते पाच दिवसांपूर्वी नांदेडमध्ये दाखल झाल्यापासून घरातच होम क्वारंटाईन होते.
अशोक चव्हाण यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिले होते. रविवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या स्वॅब तपासणी अहवालानुसार अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे;परंतु पुढील उपचारासाठी त्यांना आज नांदेड येथून रुग्णवाहिकेने औरंगाबाद मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आले. मुंबई येथील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
*हात उंचावून अभिवादन* :
अशोक चव्हाण खासगी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी रुग्णालयासमोर जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यावेळी लोकांनी हात उंचावून लवकर बरे होऊन नांदेडला लवकरात लवकर परत या अशी जणू सादच घातली.
COMMENTS