नांदेड मध्ये गुटखा माफी याचे साम्राज्य FDA अधिकारी संस्थांच्या भवऱ्यात

  नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेड जिल्ह्यात खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कर...

 

नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेड जिल्ह्यात खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ट्रकच्या ट्रक गुटखा नांदेडमध्ये दाखल होत असल्याचा दावा करत, या अवैध व्यवसायाला अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे अभय आहे का, असा सवाल विक्रम पाटील बामणीकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी जिंतूरकर यांना तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.राज्यात गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीवर बंदी असतानाही नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा सुरू असल्याचा आरोप आहे. बाहेरील राज्यांतून येणारा गुटखा विविध मार्गांनी तालुक्यांपर्यंत पोहोचवला जात असून, शहरातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमधून त्याची सहज विक्री होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. गुटख्याच्या सेवनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असताना प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.गुटख्याच्या अवैध विक्रीसोबतच बनावट व भेसळयुक्त खवा आणि पनीरचा प्रश्नही गंभीर बनल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बाहेरील जिल्ह्यांतून आणल्या जाणाऱ्या संशयास्पद खवा आणि पनीरचा वापर मिठाई तयार करण्यासाठी होत असल्याची तक्रार आहे. सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत अशा मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे अन्नविषबाधा आणि अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र, अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नियमित तपासणी आणि कठोर कारवाई होत नसल्याचा मुद्दाही बामणीकर यांनी उपस्थित केला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित कार्यक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि संशयित भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप विक्रम पाटील बामणीकर यांनी केला आहे. या निष्क्रियतेमागे संबंधित अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी न करता या प्रकरणाला न्याय मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मंत्र्यांसमोर मांडली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या निवेदनातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याच्या पुरवठा साखळीची चौकशी करून संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. बनावटव भेसळयुक्त खवा-पनीर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने आणि मिठाई विक्री केंद्रांची तातडीने तपासणी करावी. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जिंतूरकर यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांशी संबंधित अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का, याची सखोल चौकशी करावी.नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा प्रश्न खरोखर किती गंभीर आहे, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ छापेमारीचे दिखावे न करता गुटख्याचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार, साठेबाज आणि विक्रेत्यांपर्यंत प्रशासन पोहोचणार का, हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ नेमकी कोणती भूमिका घेतात? संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी आणि निलंबनाची मागणी मान्य होते का? याकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. छावा मराठा युवा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी हे निवेदन मंत्र्यांकडे सादर केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group