नांदेड,दि.१२- येथील नविन नांदेड भागातील रहिवाशी तथा ज्येष्ठ नागरिक श्रीमती आशाबाई आनंदराव जाधव यांचे काल दि.१० नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन...
नांदेड,दि.१२- येथील नविन नांदेड भागातील रहिवाशी तथा ज्येष्ठ नागरिक श्रीमती आशाबाई आनंदराव जाधव यांचे काल दि.१० नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झाले.
मृत्यूसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्रीमती आशाबाई जाधव ह्या अत्यंत धार्मिक प्रवृतीच्या होत्या. सिडको येथील शिवाजी हायस्कूल मधील शिक्षक गणेश यांच्या त्या मातोश्री होत. तर आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव व सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांच्या त्या काकू होत. त्यांच्या पार्थिव देहावर आज बुधवारी त्यांच्या मुळगावी मुखेड तालुक्यातील होनवडज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS