छत्रपती संभाजी नगरमध्ये काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा, शेतकऱ्यांचा मोर्चाला प्रचंड पाठिंबा.*
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर २६.
महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी दुष्काळाच्या हालअपेष्टा सहन करत आहे. हे संकट खूप मोठे आहे पण शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वेदनेचा आवाज भाजपा महायुती सरकारच्या कानावर पडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत पण सरकार त्यांच्यासाठी काहीही करत नाही. अदानी-अंबानीचे २० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते पण शेतकऱ्यांचे २ लाख रुपये कर्जमाफ करण्यास सरकारला काय होते? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी विचारला आहे..
छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, ओसीबीचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह मराठवाड्यीतील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चाला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना सुलतानी संकटाशीही त्याला दोन हात करावे लागत आहेत. यावर्षी खरिप पुर्णपणे वाया गेला, पेरलेले हाती लागणार नाही, आता बघायचे कोणाकडे. मायबाप सरकार भरीव मदत करेल ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. पण मुंबई व दिल्लीत आंधळं, मुकं व बहिरं सरकार बसलेले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असून दुष्काळात होरपळत असलेल्या बळीराजाची क्रर थट्टा आहे, असे सपकाळ म्हणाले..
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीत वाटण्यासाठी आमदार-खासदार खरेदी करण्यासाठी भाजपा महायुतीकडे प्रचंड पैसा आहे, उद्योगपतींसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे, लबाड लांडगं ढोंग करतंय कर्जमाफी केल्याचं सोंग करतंय, अशी आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे, राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख रुपये अनुदान सरसकट दिले पाहिजे. कोणतेही सर्वे, पंचनामे, अभ्यास न करता मदत करा. सरसकट कर्जमाफी करा. शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्या, मनरेगाची कामे सुरु करा, शेतकऱ्यांच्या मुलांची सर्व शैक्षणिक फी माफ करा, एसटी पास मोफत द्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करा व सावकारांचा जाच थांबवा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ज्येष्ठ नेते व CWC सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, खरिप हंगाम वाया गेला आहे, रब्बी हंगामातून हाती काही लागेल असे वाटत नाही. मराठवाड्यातील स्थिती तर अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांबरोबर शेतमजूरही संकटात आहे. चारा-पाण्याची परिस्थिती कठीण आहे. पिण्याचे पाणी नाही. सरकार शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचा विचार करत नाही. दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा आहे. भाजपा महायुती सत्तेत मश्गुल आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे. फक्त घोषणाबाजी सुरु असून कृती मात्र शून्य आहे, पण हे चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे. जिराईत शेतीला हेक्टरी किती मदत देणार, बागायतीला किती मदत देणार हे सांगा. मुंबईत एअर कंडिशनमधून सरकारला दुष्काळाची दाहकता कळणार नाही. बँका, फायनान्स कंपन्या व सावकाराच्या वसुलीचा तगादा बंद करा. सरकारी तिजोरी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे ती मुठभर उद्योगपतींसाठी नाही. सरकारी तिजोरी शेतकऱ्यांसाठी उघडा असे थोरात म्हणाले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करता मग शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी करण्यास काय होते?: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद.*
छत्रपती संभाजी नगरमध्ये काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा, शेतकऱ्यांचा मोर्चाला प्रचंड पाठिंबा.* मुंबई, दि. १४ ऑक्टोबर २६. मह...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
माहूर (प्रतिनिधी): माहूर येथे यवतमाळवरून देवीच्या दर्शनासाठी आलेले सहा भाविक परत यवतमाळकडे जात असताना केरोळी घाटाच्या सुरुवातीला असलेल्या ...
-
विविध भाषांमधील लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या 'हॅन्डहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाईस' साठी स्वामी राम...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
माहूर (प्रतिनिधी): माहूर येथे यवतमाळवरून देवीच्या दर्शनासाठी आलेले सहा भाविक परत यवतमाळकडे जात असताना केरोळी घाटाच्या सुरुवातीला असलेल्या ...
-
विविध भाषांमधील लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या 'हॅन्डहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाईस' साठी स्वामी राम...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
-
नरेंद्र येरावार उमरी मराठवाड्यात प्रथमच शिर्डीच्या श्री साईबाबांच्या पवित्र चरण पादुका उमरी व संतकवी दासगणू महाराजांच्या पदस्पर्शाने पाव...
-
नरेंद्र येरावार पंढरपूर, दि. १३ - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सेवा करणाऱ्या...
COMMENTS