सगरोळी/नांदेड : दि.२२ (ॲड.डाॅ.प्रकाश जोशी) माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार –२०२६ जाहीर झाले असून नांदेड येथील ज...
सगरोळी/नांदेड : दि.२२ (ॲड.डाॅ.प्रकाश जोशी)
माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार –२०२६ जाहीर झाले असून नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा दामोदरराव उमरीकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांनी दिली आहे.
माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माऊली हेल्प फाउंडेशन यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शिर्डी येथील हॉटेल शांति कमल, मनमाड रोड, ‘लुंगो इन’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विवेक (भैय्या) कोल्हे, नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात,उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले(बदलापूर),नीताताई केळकर (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (सांगली),मंजुषाताई कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय),पद्मश्री ताई धर्माधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री आशीष दामले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, पं. अनंत शास्त्री भगरे गुरुजी यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत.
कृष्णा उमरीकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार असून, ते गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक सत्यप्रभा, दैनिक श्रमिक एकजूट, दैनिक लोकपत्र, दैनिक देशोन्नती, दैनिक एकमत आणि दैनिक वृत्त केसरी या वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते दैनिक पुण्य नगरी, नांदेड येथे पूर्णवेळ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी आतापर्यंत ५० वेळा रक्तदान केले असून, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातर्फे रक्तदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी शैक्षणिक समस्यांसाठी संघर्ष केला. तसेच नांदेड आणि मराठवाड्यातील रेल्वे विस्तार व विकासाच्या आंदोलनातही त्यांनी अनेकदा सहभाग घेतला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत नांदेड शहर सहमंत्री, मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते विविध सामाजिक व पत्रकार संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना कॉ. अनंतराव नागापूरकर स्मृती राज्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कार, सत्यशोधक पत्रकारिता पुरस्कार, फुले-आंबेडकरी विचारधारा राज्य पत्रकारिता पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार आणि डॉ. शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कृष्णा उमरीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेतली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS