१४ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाची विभागीय पातळीवर निवड* लोहा,(प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पारडी येथील जि.प.प्रा.शाळेने जिल्हा...
१४ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाची विभागीय पातळीवर निवड*
लोहा,(प्रतिनिधी)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पारडी येथील जि.प.प्रा.शाळेने जिल्हा स्तरावर सलग २०१८ पासून ची आपली विजयाची परंपरा कायम राखत
दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मोठी चमकदार कामगिरी करून इतिहास रचला.१४ वर्षाखालील मुलीचा संघाने बाजी मारत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मैदानावर आयोजित १४ वर्षाखालील मुलींचे सोळा तालुक्यातील मातब्बर संघ मैदानावर दाखल झाले होते.परंतू पारडी शाळेच्या संघाने लोहा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.दिसायला अत्यंत लहानशा ,परंतु चपळाई, शिस्त,वेग, खेळातील अनुशासन व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी माहूर, नायगाव, देगलूर , नांदेड संघासोबत दोन हात करत विजयश्री खेचून आणली. संघ अत्यंत तुल्यबळ होते .जसे क्रिकेटमध्ये अत्यंत हाय व्होल्टेज सामने होतात त्याच पद्धतीचा हा फायनल चा सामना अत्यंत हाय होल्टेज चा झाला. शिस्तीत खेळणारे, दमदार, चपळाईचा खेळ खेळून जिल्हा परिषद पारडी च्या संघाने खूप वेगवान खेळ करत प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवत आपल्या अनुभवाच्या जोरावर नऊ गुणांच्या फरकाने विजयश्री खेचून आणली. व जिल्हा स्तरावर सलग २०१८ पासून ची आपली विजयी परंपरा त्यांनी कायम राखली. विशेष म्हणजे संघाची कॅप्टन कुमारी रागिनी डिकळे हिचा त्या दिवशी वाढदिवस होता व रागिनीने आपले सर्व कसब पणाला लावून अगदी अप्रतिम खेळ करून आपल्या वाढदिवसाची भेटच जणू तिच्या क्रीडा प्रशिक्षकांना व संघाला व तालुक्याला दिली असेच म्हणावे लागेल .
या यशस्वी टीमची कर्णधार कुमारी रागिनी डिकळे, उपकर्णधार श्रुती पवार, पूजा डिकळे , पुजा गायकवाड, सीमा हंकारे, पायल पवार, श्रुती पवार, श्रद्धा पांचाळ, गंगासागर पवार ,वंदना डिकळे, राधिका मटके, अनुष्का धडेकर ,शिवकन्या पवार, समृद्धी सूर्यवंशी, कांचन डिकळे, सृष्टी डिकळे, वेदिका डिकळे या सर्व खेळाडूंचा खूप मोलाचा वाटा आहे .
त्यांच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक तथा खो खो प्रशिक्षक माधव किसवे ,लोहा पंचायत समितीचे इंजिनियर तथा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे पंच श्री रुपेश चोपणे , विश्वनाथराव नळगे विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल हामदे , हणमंत जाधव क्रीडा शिक्षक,मल्लिकार्जुन कहाळेकर, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी शिर्सीकर, खो खो असोसिएशनचे नांदेड
जिल्हा सचिव रमेश नांदेडकर, तज्ञ व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक विनोद जमदाडे ,पवन जोंधळे पारडी शाळेचे खो खो मार्गदर्शक, विठ्ठल मरवाळे क्रिडा शिक्षक ,नायगाव क्रीडा संयोजक कैलास पवार, चंद्रकांत कुणके मुख्याध्यापक खरटवाडी, संदीप सूर्यवंशी योद्धा स्कूल संघ व्यवस्थापक, विजय गालेवाड राज्य पंच यांचा खूप मोलाचा वाटा आहे.सहशिक्षक फारुख शेख,विलास मंगनाळे, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कदम , सुरेखा इंगोले , मिनाक्षी वाडीकर , गोविंद देशमुख, रमेश मरखेलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पारडीच्या या विजयी संघांचे कौतुक लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष गंगाजी,मा.शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे ,माजी गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी सतीश व्यवहारे, लोहा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल आचणे सर,हौशी संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी,लोहा तालुका क्रीडा संयोजक तथा तालुका क्रीडा अधिकारी विलास नागेश्वर,केंद्रप्रमुख बी. टी. केंद्रे , माजी गट शिक्षण अधिकारी सर्जेराव टेकाळे, मा. मुख्याध्यापक तथा राजर्षी शाहू पतसंस्थेचे माजी चेअरमन बी. वाय. चव्हाण, बाबुराव फसमले मा.केंद्रप्रमुख,पाराजी पोले ,
तसेच पारडी गावचे सरपंच प्र. उद्धव पाटील डिकळे, मा. सरपंच दिगंबर पाटील डिकळे,मा. सरपंच संभाजी पाटील पवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे, पोलीस पाटील विनायक आप्पा मटके, तंटामुक्ती अध्यक्ष माधव पाटील पवार, लोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवराज पाटील पवार, बाळू पाटील पवार, युवा नेते सचिन पाटील गायकवाड, शरद पाटील पवार, त्रिंबक पवार, माजी सरपंच गोविंदराव पाटील डिकळे व्यंकट पाटील डिकळे ,देविदास बालाघाटे यांच्यासह ग्रामस्थांनी विजयी खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS