स्वारातीम विद्यापीठात नवरात्रीनिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘नवरात्रोत्सव-२०२६...
स्वारातीम विद्यापीठात नवरात्रीनिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘नवरात्रोत्सव-२०२६’ निमित्त सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन दि.१३ ऑक्टोबर, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर साहेबराव पावडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मनाचा संयम, जीवनातील समाधान आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर योगाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहेबराव पावडे यांनी केले. धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी स्वतःसाठी वेळ देणे आणि मन व शरीर यांच्यात संतुलन राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे साहेबराव पावडे यांनी सादर केलेला ‘वराड निघाले लंडनला’ हा एकपात्री नाट्यप्रयोग. आपल्या प्रभावी अभिनयशैलीने आणि सादरीकरणाने त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना खिळवून ठेवत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
विद्यापीठातील सर्व महिला शिक्षकांच्या पुढाकारातून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठातील महिला सफाई कर्मचारी, शिक्षकेतर महिला कर्मचारी आणि महिला शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून महिलांना आनंददायी वातावरणात एकत्र येण्याची, मनोरंजनाची आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूक होण्याची संधी मिळाली.

COMMENTS