नांदेड : माकपचे माजी महासचिव, ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू कॉ. सीताराम येचुरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथील महात्मा फुले स्मा...
नांदेड : माकपचे माजी महासचिव, ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू कॉ. सीताराम येचुरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथील महात्मा फुले स्मारक येथे अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी कॉ. येचुरी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कॉ. सीताराम येचुरी यांनी विद्यार्थी चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा प्रदीर्घ संघर्षमय प्रवास केला. विद्यार्थी चळवळीतून घडलेले नेतृत्व म्हणून त्यांनी एसएफआयचे अध्यक्षपद भूषविले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही व विद्यार्थी हक्कांसाठी संघर्ष केला आणि अटकेलाही सामोरे गेले.राज्यसभेतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी कामगार, शेतकरी, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या भाषणांमध्ये आकडेवारी, इतिहास आणि मार्क्सवादी विचारांचा प्रभावी संगम दिसून येत असे. देशातील धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
“लोकांच्या एकजुटीशिवाय देश वाचणार नाही” हा कॉ. येचुरी यांनी दिलेला विचार आजच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचा असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय आणि जनतेच्या हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अभिवादन सभेस कॉ. विजय गाभणे, माकप राज्य सचिव मंडळ सदस्य व मराठवाडा निमंत्रक,कॉ.गंगाधर गायकवाड पक्ष जिल्हा सचिवमंडळ सदस्य व तालुका सचिव, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, कॉ. दिगंबर घायाळे सीपीआय (एएल), डॉ.आदिनाथ इंगोले, ‘हम भारत के लोग’चे समन्वयक; श्याम निलंगेकर, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, सीटू राज्य कमिटीच्या सभासद कॉ. करवंदा गायकवाड, एसएफआयच्या जिल्हा सचिव मीना आरसे, ॲड. प्रशांत कोकणे; पवन जागडमवार, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, कॉ. प्रदीप महाजन, कॉ. मंगेश वट्टेवाड, अंबादास भंडारे, सुभाषचंद्र गजभारे, राहुल नरवाडे, चंद्रकांत लोखंडे,अनिल सिरसाट आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्ताविक कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केली. सूत्रसंचालन कॉ. उज्वला पडलवार यांनी केले, तर आभार काकासाहेब डावरे यांनी मानले.
यावेळी “कॉ. सीताराम येचुरी अमर रहे!”, “लाल सलाम!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कॉ. सीताराम येचुरी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांचा लोकशाही, धर्मनिरपेक्षता व जनतेच्या हक्कांचा लढा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS