नांदेड : नांदेड शहरातील सराफा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील ब...
नांदेड : नांदेड शहरातील सराफा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या पुढाकाराने सराफा व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. सराफा बाजारातील मुरली मंदिर येथे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला सराफा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सराफा व्यापाऱ्यांनी पोलिसांकडून होणारा त्रास, चोरीच्या घटनांमध्ये चुकीच्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या दुकानांची माहिती दिली जाणे, तसेच परराज्यातील पोलिसांकडून स्थानिक पोलिसांना माहिती न देता थेट दुकानात येऊन व्यापाऱ्यांना चौकशीसाठी घेऊन जाणे आदी विविध समस्या मांडल्या.
काही प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वसुलीची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीही बैठकीत करण्यात आल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.
आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सराफा व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आवश्यक संरक्षण मिळाले पाहिजे. चोरी किंवा अन्य कोणत्याही गुन्ह्याच्या प्रकरणात केवळ संशयाच्या आधारे व्यापाऱ्यांवर कारवाई न करता सखोल चौकशी करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सराफा व्यापाऱ्यांकडून पोलिस विभागातील काही व्यक्तींविरुद्ध करण्यात आलेल्या वसुलीच्या तक्रारींचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली. व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय राहून सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित बाबींवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमुळे सराफा व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या बैठकीस उपस्थित नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, शहरप्रमुख तुलजेश यादव, युवासेना जिल्हाप्रमुख बाळु पाटील मोरे, जिल्हासंघटक शंकर पिनोजी, सराफा असोसिएशन दक्षिणचे अध्यक्ष सुधाकर टाक,उत्तरचे अध्यक्ष शिवा टाक,अच्युत जगताप,शिरूसिंह चव्हाण,पांडुरंग येरावार,पांडुरंग लोलगे,भागवत गंगमवार,नवल बाकलीवाल,अनिल धानोरकर,श्याम उदावंत,आनंद वर्मा,बंडु धानोरकर,नरेंद्र गायकवाड यांच्यासह शहरातील सराफा व्यापारी होते.

COMMENTS