नांदेड - माहूर तालुक्यातील वझरा शे.फ. ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीबाबत महिला निवेदकांच्या सह्यांची पडताळणी तसेच गावात दारूबंदीच्या अनुषंगाने ...
नांदेड - माहूर तालुक्यातील वझरा शे.फ. ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीबाबत महिला निवेदकांच्या सह्यांची पडताळणी तसेच गावात दारूबंदीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला.
कार्यालय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, किनवट यांच्या निर्दे शानुसार रविवारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, व झरा शे.फ. येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पत्रानुसार गावातील महिलांनी दारूबंदीबाबत सादर केलेल्या निवेदनातील महिलांच्या सह्यांची पडताळणी करून गावात जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री कदम यांना सरपंच दिपक केंद्रे, माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिपक मुंडे, विजय नागरगोजे व ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा कराड यांनी प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले होते.
त्यानुसार प्रत्यक्ष ठिकाणी मौजे वझरा शेख फरीद येथे १६ ऑगस्ट रोजी एकूण ६ टेबल लावण्यात आले होते. गावातील एकूण ३२५ महिलांपैकी २९९ महिलांच्या स्वाक्षरी अथवा अंगठ्यांची नोंद घेण्यात आली, त्यामुळे दारूबंदीच्या मागणीला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक सागर शेलार, राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवटचे निरीक्षक ए. जे. कुरेशी, तसेच विभागातील दुय्यम निरीक्षक व जवान उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दीपक केंद्रे, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा कराड, पोलीस
पाटील रितेश केंद्रे, गावातील प्रतिष्ठित नागरिक हरीश मुंडे,दिपक केंद्रे, वसंत, चव्हाण, सुखदेव रनमले, उत्तम आरके, वसंत राठोड, किशन जगदाळे, राजू मुंडे, साईनाथ नागरगोजे, जीवन नागरगोजे, गजानन केंद्रे, सय्यद अली, सय्यद खाजा, शेख सलीम यांच्यासह गावातील शकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दारूबंदीमुळे कुटुंबव्यवस्था, महिलांचे जीवन आणि गावातील सामाजिक वातावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत उपस्थित महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. महिलांनी एकत्रितपणे दारूबंदीच्या मागणीसाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व नागरिकांच्या सहकार्याने गावात जनजागृतीचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
वझरा शे.फ. येथे झालेल्या या पडताळणी प्रक्रियेत ३२५ पैकी २९९ महिलांनी स्वाक्षरी किंवा अंगठा नोंदविल्याने दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले असून, गावातील सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांना आता अधिक बळ मिळणार आहे.वझरा येथे दोन बियर बार आणि एक बियर शॉपी असून लवकरच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आडवी बाटली जिंकणार अशी परिस्थिती आहे.
अशी माहिती वझरा शेख फरीद येथील मूळ निवासी तथा कामगार नेते कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

COMMENTS