यशवंत ' मध्ये प्राणिशास्त्र पदवी विभागाचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड :(दि. १७ ऑगस्ट २०२६)                 यशवंत महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. प्राणिशास्त्र विषयाच्या नव्याने प...


नांदेड :(दि. १७ ऑगस्ट २०२६)

                यशवंत महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. प्राणिशास्त्र विषयाच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

                माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र विषयाची व्याप्ती, अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, परीक्षा पद्धती, सहशैक्षणिक व अतिरिक्त- अभ्यासक्रमीय उपक्रम तसेच उच्च शिक्षण आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

                प्रारंभी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय नंनवरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विभागाची शैक्षणिक वाटचाल, अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, अध्यापनाच्या विविध पद्धती तसेच उच्च शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती दिली. बदलत्या काळानुसार विषयातील अद्ययावत ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

                 सायन्स कॉलेज, नांदेड येथील फिशरीज विभागप्रमुख डॉ. किरण शिल्लेवार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), प्राणिशास्त्र विषयाचे बदलते स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संशोधन, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण, वन्यजीव संवर्धन, मत्स्यव्यवसाय, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, अध्यापन तसेच विविध शासकीय व खासगी क्षेत्रांमध्ये प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधी स्पष्ट केल्या.

                  केवळ पदवी संपादन करण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता कौशल्यविकास, संशोधनवृत्ती, आधुनिक तंत्रज्ञान आणि विषयाचे व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, असे आवाहन डॉ. शिल्लेवार यांनी केले.

                याप्रसंगी डॉ. एच. एल. तमलुरकर, डॉ. एम. एस. कदम आणि डॉ. डी. बी. भुरे यांनी महाविद्यालयातील अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, सहशैक्षणिक व अतिरिक्त-अभ्यासक्रमीय उपक्रम, परीक्षा पद्धती तसेच स्पर्धात्मक परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित वर्गातील अध्यापनासोबत प्रात्यक्षिके, प्रकल्प, चर्चासत्रे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परीक्षेचे स्वरूप, मूल्यमापन पद्धती, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण तयारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. एमपीएससी, यूपीएससी, विविध प्रवेश परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी पदवीच्या सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा सल्लाही देण्यात आला.

                  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एच. एल. तमलुरकर, डॉ. एम. एस. कदम, डॉ. नीताराणी जयस्वाल, डॉ. धनराज भुरे, प्रा. साहेबराव माने, प्रा. नारायण गव्हाणे, डॉ. दीप्ती तोटावार आणि डॉ. रोहिणी चव्हाण यांनी सहकार्य केले.

                 सूत्रसंचालन, प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन प्रा. साहेबराव माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू भोसले, शंकर मिरेवाड, परमेश्वर राठोड आणि जगदीश उमरीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

                     या उपक्रमामुळे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र विषयाची व्याप्ती, शैक्षणिक प्रक्रिया, परीक्षा पद्धती, विविध उपक्रम, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी तसेच उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. परिणामी, विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलची उत्सुकता वाढण्यासोबतच शैक्षणिक वाटचाल आणि भविष्यातील करिअरविषयी आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.

               कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील आणि जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group