एचटीबीटी कापूस बियाणे हे तणनाशक-सहिष्णु जनुकीय सुधारित बियाणे आहे. जे भारतातील सरकारने कायद्याने बेकायदेशीर ठरवले आहे. हे बियाणे ग्लायफोसेट या तणनाशकाला सहनशील असल्याने मजुरी वाचवते, तरीही पर्यावरणास हानी होत असल्याची अफवा पसरवल्यामुळे त्यावर सरकारने बंदी आणली आहे. कायद्याने बंदी असली तरी महाराष्ट्रात याच्या लागवडीमुळे १० लाखांहून अधिक पाकिटांचा व्यापार होत आहे. पंतप्रधान ज्या राज्यातून आहेत त्या गुजरात राज्यात सर्वाधिक एचटीबीटी बियाण्याची निर्मिती व लागवड करून उत्पादन घेतले जाते पण तिथे कोणतीही कारवाई केली जात नाही. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच कारवाईचा बडगा कशासाठी उगारला जात आहे.
*काय आहे एचटीबीटी बियाणे?*
एचटीबीटी बियाण्यात 'Cp4-Epsps' जनुक असते, ज्यामुळे कापसाच्या पिकावर तणनाशक फवारले तरी पिकाला हानी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा निंदन करून तण व्यवस्थापन करण्याचा खर्च कमी होतो. हा मजूर टंचाईवर तोडगा सापडला आहे.
सरकारची केवळ बीटी कापसाला परवानगी आहे. जनुकीय बदल केलेल्या एचटीबीटी बियाण्याला परवानगी नाही. तरीही, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा येथे शेतकरी या बियाण्याचा वापर करत आहेत.
तणनाशक प्रतिरोधकता असल्याने तण काढण्याचा खर्च (मजुरी) वाचतो, कारण केवळ एक फवारणी पुरेशी ठरते
ग्लायफोसेटचा अतीवापरामुळे तणनाशकाला दाद न देणारे 'सुपरवीड्स' (शक्तिशाली तण) तयार होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे आहे. तणनाशकांच्या वापरामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. बंदी असलेल्या या बियाण्यांच्या वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक पथकांची स्थापना सरकारने केली आहे.
याच एचटीबीटी, जीएम बियाण्याची उत्पादने बाहेर देशातून आयात करून नागरिकांना पुरवली जात आहेत. मग आयात केलेल्या याच वाणांपासून कॅन्सर होणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

COMMENTS