धर्माबाद - लोहा येथील पारडी येथे नुकत्याच झालेल्या 51व्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात धर्माबाद शहरातील गुरुकुल विद्यालयने नेत्रदीपक अ...
धर्माबाद - लोहा येथील पारडी येथे नुकत्याच झालेल्या 51व्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात धर्माबाद शहरातील गुरुकुल विद्यालयने नेत्रदीपक असे यश मिळवले आहे.
शिस्त संस्कार कृतीशीलता या गुणांचा विकास होण्यासाठी स्काऊट गाईड मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक शाळेतील स्काऊट गाईड चे विद्यार्थी सहभागी होतात. गुरुकुल विद्यालयाने यावर्षी आपला सहभाग नोंदवला होता. गतवर्षीप्रमाणे त्यांनी चार पारितोषिके पटकावले आहेत . स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शेकोटी कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादर करून प्रथम ,शोभायात्रा मध्ये प्रथम आणि तंबू निरिक्षण मध्ये द्वितीय पारितोषिके पटकावले. तसेच गाईडच्या विद्यार्थिनींनी तंबू निरीक्षण मध्ये तृतीय पारितोषिक मिळवले. स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्काऊट पथकात मृत्युंजय वाडीकर, मनोहर डोंगरे ,गंगाराम कदम, प्रताप कदम ,शिवराज भुतावळे, यश पवार, युवराज भोसले, ज्ञानेश्वर गाढे ,अर्णव कुरूडवाडे, यशराज शिंदे, करण पाटिल, शशिकांत शिरोळे, महेश शिवशेट्टे ,अरुण वामनवाड तर गाईड पथकात मानसी जाधव, वैष्णवी जाधव, साक्षी सूर्यवंशी, अनुष्का शिंदे ,दुर्गा सूर्यवंशी, गंगोत्री याटलवार ,प्रिया सोनकांबळे, दुर्गेश्वरी जंगलेकर, क्षितिजा पटणे ,भाग्यश्री भोसले, समीक्षा सूरेवाड व भूमिका पांचाळ यानी सहभाग घेतला. वरील विद्यार्थ्यांना बाबळे ए. आर.,सुवर्णकार के बी.,गाईडर कुरे पाटील ए. एस. स्काऊटर बनसोडे लक्ष्मण ,आंबेराव एस. के. यांचे मार्गदर्शन लाभले व सोनटक्के एस. एन.यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ज्योती दगडगावे सचिव मानसा कंचरला रेड्डी मुख्याध्यापक मनमोहन कदम व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

COMMENTS