नांदेड,दि.१६ फेब्रुवारी :- शहराचा कार्यभार स्विकारल्यानंतर महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्य...
नांदेड,दि.१६ फेब्रुवारी :- शहराचा कार्यभार स्विकारल्यानंतर महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्याचा धडाका महापौरांनी सुरुच ठेवला असुन सोमवारी दि.१६.०२.२०२६ रेाजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.या पाहणी दरम्याण पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेसह पाणी पुरवठ्याचा आढावा घेतांना महापौरांनी जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा, गाळ उपसण्याची प्रक्रिया आणि साठवणूक टाक्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.तसेच पाणी पुरवठा विभागा अंतर्गत प्रलंबित कामांची माहिती घेतांना प्रामुख्याने काबरानगर ते देगलूर नाका दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागातील त्रुटी दूर करून नागरिकांना कोणत्याही तक्रारीविना पाणी मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दरम्यान सभागृह नेते महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, शहर अभियंता सुमंत पाटील, उपअभियंता खुशाल कदम, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके, पंप ऑपरेटर मंगेश देशमुख, संतोष गुमलवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS