नवी मुंबई सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ व मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सोनखार सानपाडा येथील कार्यालय...
नवी मुंबई सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ व मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सोनखार सानपाडा येथील कार्यालयात नवनिर्वाचित उपमहापौर श्री. दशरथ भगत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, सचिव जगदीश एकावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, उपसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, मराठा विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील, खजिनदार विष्णुदास मुखेकर, पांडुरंग वाजे, कृष्णा उतेकर, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल, लक्ष्मण उरसळ, प्रभाकर भेरे, बोराडे डी व्ही, आणि इतर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

COMMENTS