भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन व हरियाणा सॉफ्टबॉल असो. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.9 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान झज्जर (हरियाणा) येथे पार पडलेल्या 38 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुलांच्या संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी पंजाब, मध्यप्रदेश,छत्तीसगड सामन्यात आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश,संघास तसेच उपांत्य फेरीत छत्तीसगड संघास (4-3) होमरन तसेच अंतिम सामन्यात राजस्थान संघाकडून अतितटीच्या सामन्यात (1-0) होमरन च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकाविल्याबद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे डॉ.प्रवीण अनावकर, कोषाध्यक्ष संतोष चव्हाण,वसीम राजा यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष मा.मंत्री गिरीषजी महाजन,सचिव डॉ.प्रदीप तळवेळकर, सहसचिव प्रशांत जगताप,गोकुळ तांदळे, डॉ.सुरजसिंग येवतीकर,रमाकांत बनसोडे,शिवछञपती क्रीडा पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, रमेश भेंडागिरी, गणेश माळवे नितीन पाटिल,हेमंत देशपांडे, एन डी पखाले,अभय बिराज, कैलास कखरे, प्रसेनजीत बनसोडे, गणेश बेटूदे, संतोष आवचार आदींनी अभिनंदन केले. अंतिम सामन्यात शंतनु धायगुडे ने भेदक पिचिंग करत व सोहम राऊत ने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत राजस्थानच्या च्या खेळाडूना पाचही इनिंग मध्ये बाद केले पुढे हा सामना 5 इनिंग पर्यंत बरोबरी असल्यामुळे ट्राय ब्रेकर (वाढीव इनिंग) मध्ये महाराष्ट्र संघास 1 होमरन ने पराभव पत्करावा लागला. तसेच या संघास राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा आंतरराष्ट्रिय खेळाडू सुमेध तळवेलकर,NIS प्रशिक्षक भीमा मोरे,प्रणय सुखदेव,नंदिनी फेंडर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी मुलांचा संघ
मोहित तुप्ते,सोहम राऊत, शंतनु धायगुडे,देवेश मालकर,स्वरूप इंगोले, हर्षित कोळी,नयन मांढरे,सार्थक चव्हान, श्रीतेज मडले, ज्योतिरादित्य शिंदे,स्वराज सोंजे, साई पाटील सुमितकुमार राय, प्रणव तडवी,संयोग कुसराम,हर्षल नरनावरे आदी....
addComments
टिप्पणी पोस्ट करा