नांदेड:( दि.९ डिसेंबर २०२५)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीतर्फे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री-उत्कर्षाची नवी पहाट' या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. आय.सी.टी. कक्षात कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समाजपरिवर्तनाच्या तळमळीने प्रेरित अशा या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडाबाळापूर (ता. कळमनूरी, जि. हिंगोली) येथील मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ. संध्या अशोकराव रंगारी उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी आणि तर्कशुद्ध भाषणात त्यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्री-उत्कर्षविषयक विचारांचा इतिहास, हेतू आणि प्रभाव स्पष्टपणे उलगडून दाखविला. स्त्रियांना समान अधिकार देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय स्त्रीच्या जीवनात नवी आशा, नवे स्वातंत्र्य आणि नवी प्रतिष्ठा निर्माण झाली, यावर त्यांनी विशेष भर दिला. हिंदू कोड बिल हा त्या काळातील सर्वात क्रांतिकारी उपक्रम असून त्यातून स्त्री-स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीशक्तीला सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर स्तरावर दिलेल्या बळाचा उल्लेख केला. स्त्री सक्षम झाल्याशिवाय समाजाची प्रगती अपूर्ण राहते या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेची आजच्या काळात अधिक आवश्यकता भासते, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी या विचारांचे आचरणात रूपांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी सुबोध आणि आकर्षक पद्धतीने केले. कार्यक्रमाचा उद्देश, महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व आणि व्याख्यानमालेद्वारे दिली जाणारी प्रबोधनाची दिशा त्यांनी उपस्थितांना सांगितली. शेवटी आभार डॉ. मीरा फड यांनी मानले.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गौतम दुथडे, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ. संजय जगताप, डॉ.साईनाथ शाहू, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.
व्याख्यानास हिंगोली व्हाईस ऑफ मीडियाचे संपादक रमेश कदम, लॉर्ड बुद्धा चॅनलचे सदाशिव गच्चे, डॉ.एल.व्ही. पद्माराणी राव, डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ.मंगल कदम, प्रा.राजश्री भोपाळे, डॉ. नीता जयस्वाल, डॉ.एस.एम. दुर्राणी, प्रा.भारतीय सुवर्णकार, प्रा.प्रियांका सिसोदिया, डॉ.स्वाती मदनवाड, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ. श्रीकांत जाधव आदी प्राध्यापकांची आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा