परभणी (. )रांची झारखंड येथे सुरू झालेल्या पाचव्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या अद्या पूजा महेश बाहेती या खेळाडूने रौप्यपदक मिळवले. अद्याने अकरा वर्षे आतील मुलींच्या गटांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेचा पहिला टप्पा असलेल्या साखळी फेरीत केरळच्या इव्हिन श्रेया या खेळाडू 3-0 तर बंगालच्या सरकार वारैना या खेळाडूवर देखील (3-0) सहज विजय मिळवत बाद फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
बाद फेरीत आद्या समोर मध्यप्रदेशच्या माहेश्वरी आणिका या खेळाडूचे आव्हान होते हा सामना आद्या ने 11- 5, 11- 8, 11- 7 (3 0) असा जिंकला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बंगालच्या दास रूपकथा चे आव्हान देखील11- 7, 11-8, 11-9 (3-0) असे मोडीत काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला या स्पर्धेसाठी पहिले मानांकन असणाऱ्या कर्नाटकच्या साक्षा संतोष या खेळाडूचे उपांत्य फेरीत आद्या समोर मोठे आव्हान होते हे आव्हान अद्याने (3- 1) अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत स्पर्धेसाठी दुसरे मानांकन प्राप्त बंगालच्या आरी देबना या खेळाडूचेआव्हान होते .अंतिम सामन्यात आद्या चा विजयरथ थांबला त्यामुळे आद्या ला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आद्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भारतीय खेल प्राधिकरण यांच्यामार्फत चालणाऱ्या "खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र" येथे चेतन मुक्तावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते ती स्कॉटिश अकॅडमी ची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आहे. या यशासाठी सुरज भुजबळ तुषार जाधव स्वप्निल आरसुळ रोहित जोशी विक्रम हतेकर पवन कदम पियुष रामावत गौस खान पठाण चेतन सुरवसे यांचे सहकार्य लाभले.
या उज्वल यशाबद्दल राज्य अध्यक्ष प्रवीण लुकंड , राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडू
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैया वरपुडकर, कार्याध्यक्ष माधव शेजुळ, जिल्हा सचिव गणेश माळवे , सहसचिव ज्ञानेश्वर पंडित,
जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे , राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी सुयश नाटकर रोहन औंढेकर तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले परभणी क्लब चे सचिव डॉ विवेक नावंदर, सहसचिव शिवकुमार लाटकर तसेच
या यशाबद्दल सर्व खेळाडू प्रशिक्षक व पालक यांना शुभेच्छा देत अभिनंदन केल.

addComments
टिप्पणी पोस्ट करा