परभणी येथील गौरव क्रीडा मंडळाने दरवर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त शस्त्र,क्रीडा साहित्य पूजन कार्यक्रम सिटी क्लब मैदानावर नेटबॉल, स्क्वॉश, थ्रोबाॅल, रग्बी,मैदानी,टेनिस बॉल क्रिकेट,स्की अँड स्नो बोर्ड या क्रीडा प्रकारातील खेळाडू विद्यार्थी विविध शाळेतील उपस्थित होते. विजयादशमी दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त परभणीतील नवनियुक्त क्रीडा अधिकारी सुरेश नाटकर,राज्य क्रीडा मार्गदर्शक कल्याण पोले हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांचा विशेष सत्कार गौरव क्रीडा मंडळाकडून श्री कैलास माने अध्यक्ष श्री महेशकुमार काळदाते शिवाजी खुणे भारत नखाते संजय ताटे मनिष जाधव राजू कामखेडे बालासाहेब मानोलीकर उपस्थित करण्यात आला.
यावेळी श्री सुरेश नाटकर यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी क्षेत्र करियर करण्यासाठी अनेक सोयी सुविधा तयार झाल्यात आई-वडिलांचा विश्वास संपादन करून नियमित सराव करून प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे असे अमूल्य मार्गदर्शन केले याचवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते व सहभागी खेळाडू यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानव माने दीपक चव्हाण अमित पंडित सचिन जाधव शिवप्रसाद घुकसे पांडुरंग हजारे गणेश सौदागर अनिल डवरे सुमित भुसारे सिद्धेश्वर साबळे पूजा श्रीखंडे नम्रता अकूलवाड प्रतीक टाक पृथ्वीराज ठोंबरे रिचा नऊसुपे साक्षी चव्हाण राघव इजाते ते गौरव माने सई इजाते राधिका इजाते आराधना ताटे यांनी परिश्रम घेतले
addComments
टिप्पणी पोस्ट करा