कॉ.अनंतराव नागापूरकर स्मृतीदिनानिमित्त खा.वसंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत शनिवारी सहविचार सभा

नांदेड/प्रतिनिधी-प्रख्यात कामगार नेते तथा स्वातंत्रता सेनानी कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दि.6 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

डावी लोकशाही आघाडी व कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठाणच्यावतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते प्रख्यात स्वतंत्रता सेनानी यांच्या 18 व्या स्मृती दिनानिमित्त डाव्या चळवळीसमोरील राजकीय आव्हाने या विषयावर शनिवार दि.6 जुलै रोजी पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी जि.प.सदस्य अॅड.व्यंकटराव करखेलीकर, डॉ.भीमराव हटकर आदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा डावी लोकशाही आघाडीचे निमंत्रक अॅड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.विजय गाभणे, डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर, राज गोडबोले, सपाचे सूर्यकांत वाणी, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.अब्दुल गफार, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.शारदा गुरुपवार, कॉ.वैशाली धुळे, कॉ.वंदना हटकर, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.देवराव नारे, कॉ.प्रकाश बैलकवाड, कॉ.दिगंबर गजभारे, कॉ.संदीप वयवळ, कॉ.मारोती सदावर्ते, कॉ.गोविंद सरपाते, कॉ.जावेद, कॉ. अलताफ आदींनी केले आहे.

टिप्पण्या