गोदी कामगारांना मागील वेतन
कराराची थकबाकी, बोनस, नवीन वेतन कराराची बोलणी, फंडावर वाढीव व्याज या प्रमुख मागण्यांबाबत मुंबई पोर्ट प्राधिकरण व्यवस्थापनाने सन्माननीय तडजोड न केल्यास बंदर व गोदी कामगार तीव्र आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा जेष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी गोदी कामगारांच्या जाहीर सभेत दिला. मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज युनियनच्या वतीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी माझगाव येथील कामगार सदनमध्ये झालेल्या जाहीर सभेत ॲड. एस. के. शेट्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुंबई पोर्टमध्ये पूर्वी ४० हजार कामगार होते आता ४ हजार कामगार आहेत तर ३६ हजार पेन्शनर्स आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे गोदीचे कामकाज खाजगीकरणाकडे जात आहे, वाढवण बंदराच्या विरोधात मच्छीमारांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी एकत्र येऊन लढतात, ही कामगार चळवळीतील जमिनीची बाजू आहे. गोदी कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास गोदी कामगारांना नाविलाजास्त आंदोलन करावे लागेल,
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, मागील वेतन कराराची थकबाकी, बोनस, नवीन वेतन कराराची बोलणी, पीएफवर मिळालेले साडेचार टक्के व्याज वाढून मिळाले पाहिजे. गोदी कामगारांना दिवाळीपूर्वी ८० टक्के थकबाकी एक रकमी मिळाली पाहिजे. तसेच मुंबईला दीडशे वर्षे पूर्ण झाली म्हणून मोदी कामगारांना आकर्षक भेटवस्तू द्यावी, lदी कामगारांच्या मागण्या मिळविण्यासाठी कामगारांना लढावे लागेल त्याशिवाय मागण्या मिळणार नाही.
युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रचलित प्रथेनुसार ओव्हरटाईम दिला पाहिजे. प्रमुख बंदरातील स्तरावरील प्रथा मोडीत काढून पोट स्तरावरील मागण्या मान्य करून कामगारांची एकजूट तोडण्याचा पोर्ट प्रशासनाचा डाव आहे, हा आपण ओळखला पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडावर 7.1 टक्के व्याज मिळते तर मुंबई पोर्टच्या कामगारांना 4.5% व्याज मिळते हे अन्यायकारक आहे. याविरुद्ध गोदी कामगारांना लढा द्यावा लागेल. मुंबई फोर्ट प्राधिकरणाचे सदस्य व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी कामगारांना फंडाचे व्याज वाढून मिळाले पाहिजे ही भूमिका आपण बोर्डाच्या मिटिंग समोर मांडली आहे. पाच फेडरेशन बरोबर ताबडतोब मिटिंग घेऊन कामगारांना त्वरित बोनस मिळावा तसेच मागील वेतन कराराची थकबाकी गोदी कामगारांना दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी आपल्या युनियनचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत, याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी डॉ.यतीन पटेल, विजय रणदिवे, शशिकांत बनसोडे, निसार युनूस, शीला भगत, विकास नलावडे, मारुती विश्वासराव, मनीष पाटील, पुंडलिक तारी, बाळकृष्ण लोहोटे व कमिटी मेंबर आणि कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियन

COMMENTS