सोनपेठ/प्रतिनिधी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटप प्रकरण राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना देऊन अनियमिता केल्याने यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,विशिष्ट सेवा सहकारी संस्थेतील सभासद शेतकऱ्यांनाच नियमबाह्य पिक कर्ज वाटप करून गरजु सभासद शेतकरी कर्जापासून वंचित ठेवण्याचे काम बँकेतील अधिकारी करत आहेत.प्रत्येक तालुक्यात काही संस्थांना लाखो रूपये, काही संस्थांना ५० हजारच्या आत तर काही संस्थांना एक रुपयाही जिल्हा बँकेने कर्ज वितरण केलं नाही.
पात्र सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज न देता नियमबाह्य पिक कर्ज वाटप केले जात आहे.
मुख्यालयाने कर्ज वितरणास परवानगी दिलेली असताना शाखा स्तरावर बँक अधिकारी कर्ज वितरणास कोणाच्या सांगण्यावरून टाळाटाळ करत आहेत.त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी रंगनाथ सोळंके यांनी केली आहे.
COMMENTS