नांदेड - उत्तर मतदार संघातील हसापुर व सुगाव येथील 25-15 योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयवंतराव कदम, तालुका संघटक नवनाथ काकडे, उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, हस्सापुरचे सरपंच देविदासराव सरोदे, सुगावच्या सरपंच प्रियंका लोकडे, उप सरपंच अनिल शिंदे, धनंजय पावडे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील अनेक गावात 25-15 योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना सुरुवात झाली आहे. शनिवारी हसापुर येथील साई मंदिरात तसेच जुने हसापूर येथील हनुमान मंदिर परिसरात पेवर ब्लॉक च्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हसापुर गावचे सरपंच देविदासराव सरोदे, रामेश्वर काकडे, गोविंद काकडे, पांडुरंग काकडे, मारोती काकडे, रावसाहेब काकडे, शैलेश काकडे, मनोज काकडे, सागर काकडे, संभाजी सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य शोभा काकडे, प्रतिभा कांबळे, बालाजी माने, शेख असद, बालाजी चितगिरे, संभाजी राऊत, जावेद शेख, कबीर शेख, बापूराव काकडे, पोलीस पाटील भगवानराव सोनटक्के, ज्येष्ठ नागरिक गोविंदराव काकडे, केशवराव काकडे, उत्तमराव काकडे, सुदाम काकडे, प्रकाश काकडे यांच्यासह आदीजण उपस्थित होते. तसेच सुगाव येथील मुख्य रस्त्याच्या सी. सी. कामाचे भूमिपूजन आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, शाखाप्रमुख अमृत भारसावडे, पांडुरंग शिंदे, माधव महाराज हिंगमिरे, पिंटू भोसले, पंडितराव भारसावडे, दादाराव भोसले, देविदास भोसले, बालाजी शिंदे, कुंडलिक भारसावडे, शिवाजी भारसावडे, उत्तमराव भारसावडे यांच्यासह आदीजण उपस्थित होते. यावेळी दोन्ही गावातील नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. आ. बालाजी कल्याणकर यांनी देखील गावकऱ्यांशी संवाद साधताना, नांदेड उत्तर मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामे करायचे आहेत. माझ्या मतदारसंघात कोणतीही समस्या राहिली नाही पाहिजे. यासाठी मी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. पाणी व रस्ते यावर माझे लक्ष असून या समस्या मी दूर करणार असल्याचे, आ. बालाजी कल्याणकर यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते हसापुर व सुगाव येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले.


COMMENTS