वाळू माफियांची झुंडशाही चार वाळूतस्करांची सोळा मार्च पर्यंत तुरुंगात रवानगी

सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील लासिना येथे मागील अनेक दिवसांपासून स्थानिक वाळूमाफियांनी झुंडशाही स्थापन केली आहे.यात सामाजिक कार्यकर्त्...


सोनपेठ/प्रतिनिधी

सोनपेठ तालुक्यातील लासिना येथे मागील अनेक दिवसांपासून स्थानिक वाळूमाफियांनी झुंडशाही स्थापन केली आहे.यात सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण करत कायदा व सुव्यवस्थेचे धिंढोरे उडवण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने येथील चार वाळू तस्करांना १६ मार्चपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.या प्रकरणी तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने ग्रामीण भागातून प्रशासनातील या धाडसी अधिकाऱ्यांचे स्वागत केले जात आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,लासीना येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूतस्कर विकास निवृत्ती परांडे,सदाशिव सोपानराव परांडे,मंगेश बाबासाहेब परांडे,गोविंद बाबासाहेब परांडे यांच्यावर गुन्हा रजिस्टर क्र.४०/२०२१ भा.द.वी.३२३,३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी पोलीस अमलदार कुंडलीक वंजारे यांनी यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची शिफारस सोनपेठच्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली होती.डॉ.बिरादार यांनी याबाबत अहवाल सादर करत याबाबत तस्करांवर कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. यात प्रशिक्षणार्थी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ऐश्वर्या गिरी यांनी या चारही तस्करांबाबत तपासीक कार्यवाही करुन यात तथ्य आढळत असल्याने चारही वाळू तस्करांची १६ मार्चपर्यंत परभणी येथील कारागृहात रवानगी केली आहे.मागील अनेक दिवसांपासून लासीना येथून वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने या वाळुमाफियांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमुनही येथील वाळूतस्कर हाती लागत नसल्याने प्रशासन हतबल झाले होते.या कार्यवाहीमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून यापुढे वाळूतस्करांची गय करणार नसल्याचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या निर्णयात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचे दाखवून दिले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel