ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे बालाजी बच्चेवार - युवा नेते साईप्रसाद पा. कदम

 धर्माबाद (अहमद लड्डा) ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे बालाजीराव बच्चेवार हे अभिमानाने आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना ...


 धर्माबाद (अहमद लड्डा) ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे बालाजीराव बच्चेवार हे अभिमानाने आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत असतात .एक सच्चा प्रामाणिक ,इमानदार निष्कलांकित ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेली विकासाची दृष्टी असलेले नायगाव विधानसभा क्षेत्राची विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे बालाजीराव बच्चेवार. सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून नेहमी साठी एक स्वतंत्र विचारसरणी मांडणारे आम्हा कार्यकर्त्यांचे नेते म्हणजे बच्चेवार साहेब होय.

 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही संधीसाधू लोक कार्य करत असल्याचा खोटाआव आणतात परंतु कोणत्याही निवडणुका नसताना सतत आणि अविरत जनतेचे काम करणारे एकमेव नेते म्हणजे बच्चेवार साहेब आहेत जनसेवेसाठी त्यांनी आजपर्यंत करत आलेल्या कार्याचा आढावा, मूल्यमापन केले तर डोळ्यासमोर एक प्रदीर्घ काळ उभा राहतो. मुळातच कसलेही राजकीय वारसा नसलेले परंतु राजकीय मुत्सद्दी बाना अंगात असल्यामुळ अगदी नायगाव येथे भाजपाची पहिली शाखा प्रतिकूल परिस्थितीत उभे करून कार्यकर्ते जमवून भाजपाचा झेंडा नायगाव बिलोली विधानसभा क्षेत्रात फडकवला, अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला विजयश्री मिळवून दिली हे कोणालाही नाकारता येणार नाही.

 दुष्काळ सदृश्य स्थिती आणि पावसाळ्याच्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुसकान झाले तेव्हा आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्याच्या धुर्‍यावर आणण्याचे कार्य बच्चेवार साहेब यांनी केले. पूरपडी असो की गारपडी फळबागेचे सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यासाठी आहो रात्र मेहनत घेतली.

अगदी कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये गावोगाव निर्जंतुकीकरणच्या फवारण्या करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आणि तहसील कार्यालयाला वेळोवेळी संपर्क करून लोकांना मदत करून दिली. विविध माध्यमातून जनजागृती करून अनेक आव्हाने त्यांनी जनतेला ह्या काळात केली, सोशल डिस्टंसिंग पासून ते स्वच्छते पर्यंत ,अगदी लोकांना फोन करून भेटून धीर दिला गरजू लोकांना सरकारी दवाखान्याची मदत मिळवून दिली हे कार्य अविस्मरणीय आहे.

गेल्या तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीमालाला रास्त भाव मिळावा ,दुधाला भाव मिळावा, भाजीपाला टोमॅटो कांदा रास्त भावाने विकावा ,वीज बिल माफ करावे यासह तरुण युवकांच्या भावने नुसार नायगाव तालुका निर्मितीसाठी मोठे जनआंदोलन उभे करून अनेक संघर्षाला सामोरे जाऊन अगदी जेलमध्ये जाऊन नायगाव तालुका निर्मिती करून घेण्याचे कार्य बच्चेवार साहेबांनी केले हे कोणीही नाकारू शकत नाही.

 अगदी तूर्त आता शेतकऱ्यांना बँकेकडून ऋण समाधान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 गावोगाव निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर थाप देऊन ग्रामीण विकासात ग्रामपंचायत चे काय महत्व असते याचे मार्गदर्शन केले जात असून गाव पुढाऱ्यांनी मिळालेल्या संधी तुन अधिकारातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास करावा ग्रामपंचायत हेच ग्रामविकासाचे सत्ताकेंद्र असल्याचे सांगून ग्रामीण विकास करण्याबाबत आव्हान करत आहेत. असे भरीव कार्य आम्हा कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे .म्हणून ग्रामीण भागात आणि कार्यकर्त्यांमध्ये बच्चेवारांचा लौकिक कायम आहे म्हणून ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे बालाजीराव बच्चेवार हे अभिमानाने सांगावेसे वाटते▪️

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel