नायगांव ( प्रतिनिधी ) येथील रहिवासी असलेले गजानन उत्तमराव शिंदे हे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि.लक्ष्मीनगर ,देगाव येथे आपली सेवा बजा...
नायगांव ( प्रतिनिधी )
येथील रहिवासी असलेले गजानन उत्तमराव शिंदे हे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि.लक्ष्मीनगर ,देगाव येथे आपली सेवा बजावत असताना एका आजारामुळे त्यांच एप्रिल महिन्यात निधन झाल होत.त्यामुळे कामगार संघटनेच्या वतीने त्यांच्या वारसदाराला आर्थिक मदत करण्यात आली असून,बुधवारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव मोहनराव धर्माधिकारी यांच्या हस्ते १ लाख ९६ हजार ३२६ रुपयांचा धनादेश मयत गजानन शिंदे यांच्या वारसदाराकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी दिगंबर धर्माधिकारी,महेश धर्माधिकारी, सूरेवाड मामा,बाबू पचलींग,सोमनाथ पचलींग आदी उपस्थित होते.
COMMENTS