किल्लेधारूर (दिनेश कापसे ) याबाबत सविस्तर असे की केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी बील बहुराष्ट्रीय कंपन्याच्या दबावाखाली येऊन संसदे मध्ये चर्चा न करता घाई गडबडीत शेतकरी व कामगार विरोधात निर्णय घेतल्या मुळे आज दिंनाक २५ / ९ / २०२०रोजी पुर्ण देशामध्ये शेतकरी व कामगांर केंद्र सरकारच्या विरोधात बंदची घोषणा केली आहे . त्या अनुसंगाने महाराष्ट्र किसान सभा व कामगार संघटनेने , शेतक -याच्या शेतावरील सर्व कामे मनरेगा मार्फत करा ., सर्व पिकाना विमा मंजुर करण्यात यावा . शालेय पोषण आहार कांमगारांचे मानधन तात्काळ वापट करा . आयकर लागु नसणाऱ्या सर्व कांमगाराना कोराना काळात ७५००रू महिनाद द्या . लॉक डाऊनच्या काळातील , रिक्षाचालक , बांधकांम कामगांर , शालेय पोषण आहार कामगार , आशा , अंगणवाडी , ऊस तोड कांमगार यांना १०००० रू सानुग्राहआनुदान दया . इत्यादी मागण्यासाठी किल्लेधारूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनावर कॉ अॅड संजय चोले , कॉ काशिराम सिरसट , कॉ मोहन लांब .कॉ डॉ अशोक थोरात , कॉ मधुकर चव्हाण , जगन्नाथ जाधव ईत्यादीच्या सह्या आहेत .
COMMENTS