नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळूनही हा पुरस्कार धुळीस मिळविणारा नागपुर येथील अंबाझरी शाळेतील शिक्षक आरोपी राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यास पोक्सो कायद्या अंतर्गत अटक करावी या मागणीसाठी दि.२५ रोजी जिल्हाधिकारी नांदेड, मा.विशेष महा परिक्षेत्र पोलीस निरिक्षक नांदेड , पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे आॅर्गनायझेशन फाॅर राईट आॅफ ह्युमन या संघटनेच्या वतिने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.सबंधित शिक्षक हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असल्याने या गुन्ह्याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार धुळीस मिळविणारा अंबाझरी नागपुर येथील आरोपी शिक्षक राजेंद्र दादाजी मसरकोल्हे यास शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सन २०१८ मध्ये बडतर्फ करुन विभागीय चौकशी नेमण्यात आली होती.विभागीय चौकशीच्या अहवालात राजेंद्र हा दोषी आढळल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी नागपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.त्यामुळे प्रशासन अशा आरोपीस जाणूनबूजून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे का असा संशय निर्माण झाला आहे.आरोपी राजेंद्र मरसकोल्हे व्यवसायाने शिक्षक असल्याने गुरु शिष्याच्या नात्याला त्याने काळीमा फासला आहे.त्यामुळे अशा शिक्षकाला अटक न केल्यास शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संशयास्पद बनू शकतो असे आफ्रोह संघटनेच्यावतीने म्हणने आहे.त्यामुळे अशा आरोपीस कोणतीही क्षमा न करता पोक्सो अंतर्गत अटक करुन कठोर शिक्षा द्यावी अन्यथा आफ्रोह संघटने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.याप्रसंगी आॅफ्रोहचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रे अन्नमवाड सह नांदेड जिल्ह्यातील आफ्रोह चे इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती .
COMMENTS