धर्माबाद-(अहमद लड्डा)
राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज धर्माबाद शहरात शासनाच्या नियमांचे पालन करीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती मारुती पाटील कागेरू यांनी दिली आहे.
पंचायत समितीच्या सभापती कक्षात पत्रकार सभापती मारुती पाटील कागेरू यांच्या वतीने ,तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना मास्क, सॅनिटायझर भेट देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सोहन मांचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तालुका संघटक गणेश गिरी यांनी पत्रकार बांधवांना राशन धान्य किट देऊन सत्कार केला यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड ,माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तदनंतर नगर परिषद कार्यालय येथे सफाई कामगार बांधवांना मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास सभापती मारुती पाटील कागेरू,शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी,माजी शहर प्रमुख राजू शिरामने ,गणेश दुदूलवाड,गौराजी विभूते ,आदींसह शिवसैनिक उपस्थित होते
सभापती मारुती कागेरू यांच्या वतीने पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे प्रत्येकी 5 लिटर सॅनिटायझर व सोबत स्प्रे मशीन देण्यात आली.
COMMENTS