जळकोट प्रतिनिधी सध्या महावितरणचा भोंगळ कारभार चालू असून याच भोंगळ कारभारामुळे मंगरूळ येथील ऑपरेटर चालक रामचंद्र चित्ते बोईनवाड याचा दुपारच्...
जळकोट प्रतिनिधी
सध्या महावितरणचा भोंगळ कारभार चालू असून याच भोंगळ कारभारामुळे मंगरूळ येथील ऑपरेटर चालक रामचंद्र चित्ते बोईनवाड याचा दुपारच्या सुमारास कनेक्शन देताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीअसून यामुळे महावितरणच्या या भोंगळ कारभार तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगरूळ तालुका जळकोट येथील महावितरणचा ऑपरेटर रामचंद्र चित्ते बोईनवाड हा एका शेतकऱ्याच्या डीपी चे कनेक्शन देत असताना अचानक विद्युत तार एकत्र झाल्यामुळे याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे एका ऑपरेटरचा हकनाक बळी गेल्याने महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
COMMENTS