महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शिक्षकांना आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत वर्षानुवर्षे होत असलेला मानसिक व आर्थिक ञास कमी करून शिक्षकांच्या पारदर्शक ऑनलाईन बदल्या करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेल्या, *महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान माजी ग्रामविकास मंञी पंकजाताईसाहेब मुंडे* यांनी आज ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून मराठवाड्यातील शिक्षणप्रेमी कार्यकर्ते, शिक्षक व संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी ऑफलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांना होणारा मानसिक व आर्थिक ञास या महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाईन संवाद साधला. या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिक्षकांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
*मराठवाडा शैक्षणिक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे माजी चेअरमन शिक्षक नेते रमेशभाऊ पोकळे* यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील या ऑनलाईन बैठकीचे आयोजन *रमेशभाऊ पोकळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून ऑनलाईन बदल्या संदर्भात तातडीने शिक्षकांशी संवाद घडवून आणल्या बद्दल माजी ग्रामविकास मंत्री ना पंकजाताईसाहेब मुंडे यांनी रमेशभाऊ पोकळे यांचे विशेष कौतुक केले.*
*या बैठकीला माजी मंत्री आ. बबनरावजी लोणीकर, आ.सुरेशआण्णा धस, आ.सुजितसिंहजी ठाकूर, आ.तानाजीरावजी मुटकूळे, आ.तुषारजी राठोड, आ.लक्ष्मणराव पवार, आ. राजेशजी पवार, आ.संतोषजी दानवे, माजी आ.गोविंदअण्णा केंद्रे, देवीदासजी राठोड,शिरिषजी बोराळकर,प्रविणजी घुगे,प्रतापभैय्या देशमुख, अजितरावजी मगर , रामभाऊ कुलकर्णी, सुरेशजी दंडवते, बाळकृष्ण थापडे,विकास गवते, आनंद पिंगळे, भारतजी तोंडे, मंगेश जैवाल, सुरेखा खेडकर, राहूल उंडाळे श्रीराम बोचरे, शेख जलील, राजेंद्र लाड, अशोक बांगर,जगदीश धसे,अजित मगर, पुरूषोत्तम काळे, मदन मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील मान्यवर शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.*
COMMENTS