आ. सोळंकेंनी विनंतीवजा दम देताच जिनींग चालक ताळयावर
-- अवघ्या दोन तीन दिवसांत कापुस खरेदीसाठी जागा उपलब्ध करण्याच्या सुचना
-- सभापती डक यांनी साधला जिनींगचालक आणि आ.सोळंके यांच्यात समन्वय
माजलगांव/प्रतिनिधी
शेतक-यांचे हित लक्षात घेता मागील तब्बल दोन महिने आ. सोळंके यांनी सतत पाठपुरावा करुन तालुक्यात 11 कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले मात्र विविध कारणांनी सतत बंद पडत असलेली कापुस खरेदी आणि जिनींग मालकांनी आठ दिवस जिनींग बंद ठेवण्यासाठीचे दिलेले निवेदन यातुन शेतकरी पुन्हा वेठीस धरला जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती मात्र सभापती अशोक डक यांनी तात्काळ सोमवारी आ. सोळंके आणि जिनींग मालक यांच्यात बैठक घडवुन आणली ज्यात आ. सोळंके यांनी जिनींग मालकांना चांगलाच विनंतीवजा दम भरल्याने पुढील दोन तीन दिवसात कापसासाठी जागा तयार करण्याचे जिनींग मालकांनी मान्य केले.
तालुक्यातील सर्वच जिनिंगवर मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी झाली आहे.परंतु पावसाळ्यामुळे कापसावर प्रक्रिया करणे मुश्कील झाले आहे. आहे तो कापूस उन्हात वाळवावा लागत आहे.कापसाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे कुठल्याही जिनिंगवर कापूस ठेवण्यास जागा शिल्लक नाही. पावसाळी परिस्थिती पाहता कापूस भिजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येणारा कापूस ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने बाजार समितीने काही काळ कापूस खरेदी बंद ठेवावी असे निवेदन जिनिंग चालक संघटनेच्यावतीने बाजार समितीस दिले. निवेदन हाती पडताच कापुस घेवून येणा-या वाहनांना बाजार समितीला पुन्हा फोन करुन थांबवावे लागले. जिनींग चालकांच्या निवेदनामुळे कापुस खरेदीत पुन्हा अडथळा निर्माण होत असल्याचे पाहुन बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी तात्काळ जिनींगचालक आणि आ. सोळंके यांच्यात बैठक घडवुन आणली ज्यात आ. सोळंके यांनी शेतक-यांना जुजबी कारणास्तव वेठीस न धरता तात्काळ आपापल्या जिनींगमध्ये जागा उपलब्ध करा असा विनंतीवजा दम भरताच जिनींग चालक ताळयावर आले व जिनींग मालकांनी आपली पाउले मागे घेत येत्या दोन तीन दिवसांत जागा उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्यामुळे पुढील दोन तीन दिवसांत कापुसखरेदी ही पुर्ववत चालु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या बैठकीला सभापती अशोक डक, संचालक प्रभाकरराव होके व सर्व जिनींग चालकांची उपस्थिती होती.
COMMENTS