तहसीलदारांचे लेखी आदेश ; कार्डधारकांना धान्य वाटप नाही ; जलसमाधी आंदोलन करणार -- अँड. अमोल डोंगरे
माजलगाव : प्रतिनिधी
चिंचगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदार हे कार्ड धारककांना मोफतचे व विकतचे धान्य वाटप करीत नसल्याने लाभार्थ्यांना योजनेचा कुठलाही लाभ हा स्वस्त धान्य दुकानदार देत नसल्याने चिंचगव्हाणचे कार्डधारक लाभार्थी हे माजलगाव धरण परिसरात 1 जून रोजी अँड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून निवेदन अँड.अमोल डोंगरे यांनी दिले आहे.
लाभार्थ्यांच्या रेशन कार्डवर 12 अंकी क्रमांक हा तहसीलच्या पुरवठा विभागाने दिलेला असतांना हे नागरिक 30 ते 35 वर्षापासून या गावचे नागरिक असून त्यांचा चिंचगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट आलेले असून हे सर्व लाभार्थी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क गावात बजावतात परंतु सदर गावातील स्वस्त धान्य दुकानदार उद्धट स्वभावाचा असून तो नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असून आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे धान्य वाटप केले नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागील पाच वर्षापासून येथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन केली परंतु तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सदर आंदोलन लेखी आश्वासन देवून मागे घेण्यास लावले व सदर कार्डधारकांना धान्य वाटप करु असे सांगितले परंतु त्यानंतर ही स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटप करीत नसून माझी तक्रार करायची तर करा,माझं कोणी काही वाकडे करणार नाही असं म्हणत कार्डधारकांना धमक्या देत आहे.सदर स्वस्त धान्य दुकानदार,पुरवठा अधिकारी,लिपिक यांची खाते निहाय चौकशी करुन संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी व नागरिकांना नियमाप्रमाणे धान्य वाटप करावे अन्यथा 1 जून रोजी माजलगाव धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे अँड.अमोल डोंगरे यांनी दिले आहे.
COMMENTS