अब्बूंचे मोदक' म्हणजे गोड गोड गोष्टी! डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
फारूक एस. काझी हे बालकुमारांचे आवडते असे प्रयोगशील लेखक आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांना बालमानसाची चांगली जाण आहे. आजवर त्यांची मित्र, प्रिय अब्बू, तू माझी चुटकी आहेस, चित्र आणि इतर कथा, शिंजीर दिवसभर का बरं खात राहतो, मी जेव्हा मोठी होईन तेव्हा, आनंद, चुटकीचं जग, ए हाड नावाच…
