*राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या राज्यस्तरीय गं.द.आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धेत मालेगावचा खुर्शीद संघ अजिंक्य!*
मुंबई दि.१५: राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित मुलु़ंडच्या 'पराग' हायस्कूलच्या प्रांगणावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत मालेगावच्या खुर्शीद संघाने प्रतिष्ठेचा गं.द.आंबेकर चषक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पुण्याचा कावेरी संघ उपविजेता ठरला आहे.२१पॉईंटच्या अंतिम सामन्…
