मुंबई दि.१५: राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित मुलु़ंडच्या 'पराग' हायस्कूलच्या प्रांगणावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत मालेगावच्या खुर्शीद संघाने प्रतिष्ठेचा गं.द.आंबेकर चषक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पुण्याचा कावेरी संघ उपविजेता ठरला आहे.२१पॉईंटच्या अंतिम सामन्यात एकच गोल ठरला होता. त्यात अटीतटीच्या लढतीत मालेगावच्या खुर्शीद संघाने २१/२ गुणाने पुण्याच्या कावेरी संघावर मात केली आणि या स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले.
आंबेकर शुटिंग बॉल क्रीडा स्पर्धेचा आस्वाद उपनगरातील रसिकांना घेता यावा,या लोकाग्रहास्तव सदर स्पर्धा येथे घेण्यात आल्या.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. शिवसेनेचे माजीआमदार सुभाष बने यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
स्पर्धेत तृतीय क्रमांक साता-याचा विजय स्पोर्ट क्लब,चतुर्थ रायगडचा छत्रपती,पाचवा क्रमांक मुंबईचा ऑथॉरेटी,सहावा क्रमांक सांगलीचा जयंत खंडागळे,सातवा क्रमांक टेंभुर्लीचा जयंत घोरपडे, आठवा क्रमांक पालघरच्या डिस्टिक संघाने पटकावला.
सर्वोत्तम खेळाडू दस्तगीर पानसरे,सामनावीर खुर्शीद मालेगाव यांची निवड झाली.
एकूण १८ सामने बादपद्धतीने खेळविण्यात आले.शुटिंग बॉल असोसिएशचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सेक्रेटरी दिपक सावंत,संघटनेचे उपाध्यक्ष क्रीडा प्रमूख सुनिल बोरकर,राष्ट्रीय शुटिंग बॉल खेळाडू
चंद्रकांत पाटील आणि
अशोक चव्हाण(संयोजक),आंबेकर श्रम संशोधनचे संचालक,जी.बी.गावडे,सहकारातील कुशल संघटक श्री.कडांगणे यांच्या खास उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय शुटिंग बॉल खेळाडू संजीवकुमार यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.पांडूरंग सुतार,दिलीप मालंडकर आदींचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.•••
addComments
टिप्पणी पोस्ट करा