आधुनिक पिढीने महापुरुषांकडून इतरांसाठी जगण्याची प्रेरणा घ्यावी* -डॉ.अजय गव्हाणे


 नांदेड:(दि.१६ डिसेंबर २०२३) 

          छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे धर्मनिरपेक्ष आणि कायद्याचे राज्य निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यावर आधारित भारतीय संविधान दिले. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या तत्त्वांच्या आधारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेलाच ईश्वर मानले. या सर्व महापुरुषांनी सेवा, सहकार्य, त्याग, समर्पण हे तत्व समोर ठेवून इतरांसाठी चांगले व सुंदर जग निर्माण केले. त्यामुळे आधुनिक पिढीने महापुरुषांकडून इतरांसाठी जगण्याची प्रेरणा घ्यावी; असे विचार यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी व्यक्त केले.

           ते गुजराथी हायस्कूलमध्ये 'आधुनिक पिढीने महापुरुषांचे विचार व कर्तृत्वापासून घ्यावयाची प्रेरणा' या विषयावरील व्याख्यानात दि.१५ डिसेंबर रोजी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

           याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रवि सुमठाणकर आणि क्रीडा शिक्षक संजय नायक होते.

           कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप रवि सुमठाणकर यांनी केला. सूत्रसंचालन सौ.वैद्य यांनी केले तसेच आभार देखील मानले. व्याख्यानास शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या